सोमवार, २७ एप्रिल, २०२०

कोरोना मुळे झालेली प्रियकर आणि प्रियसी ची अवस्था


खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही 
समोर समोर बोलणं नाही.
फोनवरच असतं सगळं रात्र रात्र 
आता नाहीत ती कागदी पत्र
ऑनलाईन झालाय जगणं
व्हर्चुअल झालाय आता प्रेम
चॅटिंग म्हणजे सगळं असतं 
सेटिंग म्हणजे प्रेम 
स्टेटस ठेवण म्हणजे
भावना व्यक्त करणं
दोघांच चाललंय 
एकमेकांसाठी झुरणं.. 
बस संपूदे हा कोरोना  
आम्हाला एकमेकांना आता भेटू दे 
खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही 
समोर समोर बोलणं नाही.

ⓒPrakash