आपला विश्वास स्वतःवर नसतो.स्वतःवर विश्वास असता तर मनात आणलेली प्रत्येक गोष्ट खरी करण्याची ताकद आपल्यात असते. आणि ती गोष्ट खरी करून दाखवली असती. पण आपलं तसं नसत.जेव्हा आपण असं करू तेव्हा नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
मनात खूप कल्पना असतात पण त्या प्रत्यक्षात आणताना खूप अडचणी येतात त्या अडचणी कश्या दूर करायच्या व त्यासाठी काय उपाय करता येतील जेणेकरून आपलया मनातील कल्पना आपली ध्येय प्रत्यक्षात आणता येतील. हे शोधणं गरजेचं आहे.
नवीन काही तरी करण्याची प्रेत्यकाची इच्छा असते पण अंमलबजावणी करण्याची वेळ येते. तेव्हा मग घरातले शेजारचे गावातले काय बोलतील हा एका प्रश्न समोर उभा राहतो आणि या प्रश्नात आपण जर अडकलो कि काय करावं हेच काळात नाही आणि मग आपण समोर येईल. ते मिळेल ते करत असतो .आजकालची तरुण पिढी नवीन इनोवेशन मध्ये मागे पडत आहे.
जगात काय चालू आहे कोणत्या क्षेत्रात संधी आहे त्यात आपण काय करू शकतो आपल्या स्वतःची आवड काय आहे. आपल्याला काय करायला जमेल याचा शोध घेतला पाहिजे. स्वतःवर विश्वास असेल तर हे नक्की करू शकतो या साठी त्यांना घरातून प्रोचाहन दिलं पाहिजे. शालेय शिक्षणा सोबत व्यवसायिक शिक्षण घेणं हे महत्वाचं आहे.
म्हणून म्हणावं वाटत की इतरापेक्ष्या स्वतःवर विश्वास ठेवावा आणि ध्येय प्राप्ती साठी प्रयत्न करावं. इतरांचा विश्वास तुमच्या वर असेल तर तुम्ही फक्त नोकरीच करू शकता स्वतःवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नोकरी निर्माण करु शकता..
ⓒPrakash