बुधवार, ८ एप्रिल, २०२०

ध्येय ठरवा आणि ते मिळावा

खरंतर प्रत्येकात काही तरी बनण्याची क्षमता असते.शैक्षणिक जीवनात काय बनायचं आहे हे निश्चित करणं गरजेचं असत.या साठी घरातील वातावरण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असत.मार्गदर्शन योग्यवेळी आणि योग्य मिळालं तर आपण आयुष्यात नक्कीच आपलं स्वतःचा ध्येय ठरवू शकतो आणि ते ध्येय गाठू शकतो.प्रत्येकच्या मनात आपण काहीतरी बनलं पाहिजे हे असत पण नक्की काय बनलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याची योग्य अशी प्लांनिंग नसते दिशा ठरलेली नसते आणि मग वेळेनुसार आपल्या आयुष्यत जे  घडत जातं किंवा आपण करत जातो यातच समाधान मनात जातो..शालेय जीवनात मनात असत कि आपण काहीतरी  बनलं पाहिजे.नोकरी व्यासायिक इंजिनियर शिक्षक लेखक गायक  पण जे काही बनायचं आहे त्या साठी मार्गदर्शन नसल्याने आयुष्यात जे कधी मिळत जाते त्यात समाधान मानात असतो. नोकरी म्हणजे आपल्याला पुढे काहीतरी भेटेल या आशेने आपण करत असलेली तडजोड असते. सध्या पगार कमी आहे नंतर वाढेल पुढे साहेब चांगला आहे शिकायला भेटत एका ना अशी खूप वाक्य आपण अनेक जणांकडून ऐकत असतो.आणि मग वर्षाला हजार वाढतात म्हणून तीच नोकरी आयुष्यभर करत राहतो..एकदा का संसाराच्या गाड्यात अडकला कि ती नोकरी म्हणजे सर्वस्व उरतं.जास्त पगाराच्या नोकरीसाठी जुनी नोकरी सोडून नवी शोधू शकत नाही करणं नवी नोकरी मिळेल याची शास्वती नाही.जगण्याच्या  एका रुटिंगची सवय झाली ती बदलण्याची भीती मनात असतेच. त्यातून बाहेर पडणं कठीण असत.
खरंतर आपण जेव्हा कॉलेज संपून बाहेर पडतो तेव्हा आपण काय बनायचं  हे ठरलेलं असलं पाहिजे.कोणत्या क्षेत्रात जायचं याची प्लांनिंग ठरलेली असली तर नक्की आपण आपलं ध्येय गाठू शकतो..
तुर्ताच.थांबतो आणि इतकंच सांगू इच्छितो
"प्रेत्यक व्यक्ती बॉम्ब सारखी असते
फक्त त्याची पिन काढायची गरज असते ".
आपल्यात खूप काही बनण्याची क्षमता असते
पण आपण काय बनत असतो हेच आपल्याला लक्षत येत नाही..
:-धान्यवाद
ⓒPrakash