गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

भेटली होती ती

चारोळ्या 
1)भेटली होती ती
आवडली होती ती
मनात भरली होती ती
म्हणून निवडली होती ती

२)काय चाललंय आपल्यात
हे असं बरोबर नाही
ती म्हणते प्रेम आहे 
बाकी खोटं असं काही नाही

3)आज भेटलोय आपण
उद्या असा भेटायाच त्रास नको
तो म्हणतो ठीक आहे 
पण भेटायची वेळ झाली
की मग तुझा भास नको

4) ती म्हणते आजकाल
आपण रोज भेटतो
त्यात नवल काय असं
आपण कालचीच कहाणी रेटतो

5)त्या दिवशी तुझ्या येण्याची
    कारणे मला कळली होती
    म्हणून पुन्हा माझी वाट
      तुझ्या कडे वळली होती