तुम्हीच सांगा आता आमच्या गावाचं गाव पण कुठे गेलं!
आज तीस वर्षे झाली लहानपणापासून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीना बारकाईने बघत आलोय आपला गाव आपली शेती बैलगाडी सायकल आणि एसटी म्हणजे अताचा लाल डबा आता आपल्यासाठी तो लालडबा झालाय पण एक पंधरा वीस वर्षांपूर्वी तो आपल्याला शहराकडे घेऊन जाण्याचा एकमेव साधन होती. असो आज असं विचार करतोय की
आपला गाव कसा हळूहळू बदलत गेला. सगळेच लोकं शेती करत होते कुडाची घरे तर काही कौलची घरे त्यात नंतर सिमेंटचे पत्रांची घरे आली पण आता ती ही कमी होत चालली आहेत आता सिमेंटचा स्लाप झालाय बिल्डिंग आल्यात कारण "शेतकऱ्याला जमिनीचा पैसा पण आलाय."
सगळ्यात गावाला नैसर्गिक सुंदर होत आंबे जांभळी करवंदे बोरे असे कित्येक झाडे होते नैसर्गिक सौंदर्य खूप होता. झाडाच्या सावलीत म्हातारा आजोबा सहज झोपी जात होते. आज बंद खोलीत एसी असून सुद्धा काहींना झोप लागत नाही.
विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पांसाठी गेल्या काही ठिकाणी प्रकल्पही उभारले एमआयडीसी सिडको असे अनेक प्रकल्प आज शेतकऱ्यांच्या जीवावर आले त्यांच्या जमिनी हस्तांतरित केला आणि इथला शेतकरी भूमिहीन झाला जी काही थोडीफार जमीन उरली आहे त्यातही आज नैना आली आहे navi mumbai influence notified area (NAINA) त्यांनी उरलेली जमीन घेण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना पूर्णता भूमिहीन करण्याचा जणूकाही कट रचला आहे असा विकासाच्या नावावर इथल्या स्थानिकांच्या जमिनी प्रकल्पांना जात आहेत. ज्या जमिनीवर इथला भूमिपुत्र वर्षानुवर्ष शेती करत होता व आपली उपजीविका करत होता.. खूप जण म्हणत असतात जुना काळ कसा होता खरच जुना काळ बराच होता कारण त्यावेळी घरात एकी होती गावात एकी होती आणि समाजातही एकी होती पण आता बदल होत गेला आणि माणस स्वार्थी होत गेली. इतके बदल झाले. मातीच्या घराच्या भिंतींना ओलावा होता तसाच ओलावा त्या काळातल्या माणसाच्या नात्यांनाही होता.पण सिमेंटच्या घरांप्रमाणेच काडक कठोर झाली आहेत.
गावात जर कोणी आजारी असेल तर पूर्ण गाव त्यांना पाहण्यासाठी येत होता. पण काळ बदलला आता कुणी मेला तरी पाण्यासाठी जात नाही आपल्याला काय करायचंय आहे ते बघून घेतील अशी वृत्ती झाली आहे.
असं गावात राहिला नाही जिथे माणसात माणुसकी होती आणि सर्व माणसेही सुखी होती....
म्हणून म्हणावं वाटलं
"सिमेंटच्या जंगलानी हिरवळीवर राज्य केलं"
"तुम्हीच सांगा आता आमच्या गावाचं गाव पण कुठे गेलं!"
ⓒPrakash