शनिवार, २७ जून, २०२०

काळ


भूतकाळ भविष्य काळाला भेटला 
मग मी कसा आणि तू कसा असशील
असे प्रश्न निर्माण होऊ लागले 
वर्तमान गप्प उभा होता आता कसा जगायचं या प्रश्नात
भूतकाळ चांगला होता त्यात भविष्याची चिंता दिसत नव्हती 
तो जगून गेला होता वर्तमान चिंतेत होता तो भविष्यात कसा जगायचं या ?
ⓒPrakash

बुधवार, २४ जून, २०२०

आमचं टॅलेंट

साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं ध्येय
तुमच्या या नोकरीत राख  झालं
फास्ट सेकंड नाईट 
करता करता तुमचं काम झाक झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
तुमची कामे करता करता 
माझ्या आयुष्यच सगळ्यांकडून
मोजमाप झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
प्रमोशन डोळ्यासमोर ठेवून 
इथंच करियर आहे हे मनात आला
थोड्या प्रशंसेल भुलून साहेब साहेब केलं
तरीपण  काढून टाका याना अस मनात तुमचा आले
साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं स्वप्न राख झालं
अरे मीच तो हरामखोर कामगार 
इवल्याश्या नोकरीत समाधान मानुन
स्वतःच्या ध्येयला विसरून आज म्हणतो
साहेब माझं टॅलेंट खाक झालं
मनाशी बाळगले स्वप्न राख झालं
ⓒPrakash