मी मनातला ! खरंतर प्रत्येक जण स्वतःच्या मनात स्वतःच एक वेगळं अस्तित्व घेऊन जगात असतो.कधी ना कधी एकांतात बसून जगण्यापलीकडे एक विचार करत असतो. त्या विचारांना जोड म्हणुन हा ब्लॉग
गुरुवार, ९ एप्रिल, २०२०
भेटली होती ती
चारोळ्या
1)भेटली होती तीआवडली होती तीमनात भरली होती तीम्हणून निवडली होती ती
२)काय चाललंय आपल्यातहे असं बरोबर नाहीती म्हणते प्रेम आहेबाकी खोटं असं काही नाही
3)आज भेटलोय आपणउद्या असा भेटायाच त्रास नकोतो म्हणतो ठीक आहेपण भेटायची वेळ झालीकी मग तुझा भास नको
4) ती म्हणते आजकालआपण रोज भेटतोत्यात नवल काय असंआपण कालचीच कहाणी रेटतो
5)त्या दिवशी तुझ्या येण्याचीकारणे मला कळली होतीम्हणून पुन्हा माझी वाटतुझ्या कडे वळली होती
चारोळ्या-1
1)आठवणींचा तुझ्या
काळजाला स्पर्श होतो.
आठवणीत तुझ्या प्रेमाचा
मलाही मग हर्ष होतो.
2)अधीन झालोय मी
स्वाधीन झालोय मी.
मी तिच्या प्रेमाचा
बाधित झालोय मी.
3) पहिल्यांदा पाहशील
रागणेच पाहशील.
मग इतक जवळची हो
की मनातलं ओळखशील.
4)उतरव तू चस्मा
वेगवेगळ्या रंगाचा.
सांग आता धर्म कोणता
आकाशाचा आणि सूर्याचा.
5)भेटणार्यांना भेटण्याची
कारणे खूप असतात.
आणि न भेटणार्यांना ती
द्यायची नसतात.
बुधवार, ८ एप्रिल, २०२०
आपलं डोकं
आपलं डोकं आहे ना ते काही पण करू शकत कोणती असाध्य ते साध्य करू शकतो.आपल्याला हवं ते करू शकतं त्याच्या कडून आपण करवून घेऊ शकतो
पण आपण त्याला समजूत घालून एखाद्या ठिकाणी किवा एखाद्या आशेत ठेवत असतो.समाधानी करून ठेवत असतो सर्व ठीक होईल असा होईल थोडा वेळ लागेल. पण होईल अश्या आशेवर पण मग तसं कधी तरी नाही झालं तर विचार करत बसण्याची वेळ येते म्हणून वाटत कि आपण आपल्या सीमा आजमावल्या पाहिजेत सुरवातीला त्रास वाटेल पण एकदा का आपण यशस्वी झालो कि सर्व आपलाच असत.प्रयत्न कारण गरजेचं आहे
ध्येय ठरवा आणि ते मिळावा
खरंतर प्रत्येकात काही तरी बनण्याची क्षमता असते.शैक्षणिक जीवनात काय बनायचं आहे हे निश्चित करणं गरजेचं असत.या साठी घरातील वातावरण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असत.मार्गदर्शन योग्यवेळी आणि योग्य मिळालं तर आपण आयुष्यात नक्कीच आपलं स्वतःचा ध्येय ठरवू शकतो आणि ते ध्येय गाठू शकतो.प्रत्येकच्या मनात आपण काहीतरी बनलं पाहिजे हे असत पण नक्की काय बनलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याची योग्य अशी प्लांनिंग नसते दिशा ठरलेली नसते आणि मग वेळेनुसार आपल्या आयुष्यत जे घडत जातं किंवा आपण करत जातो यातच समाधान मनात जातो..शालेय जीवनात मनात असत कि आपण काहीतरी बनलं पाहिजे.नोकरी व्यासायिक इंजिनियर शिक्षक लेखक गायक पण जे काही बनायचं आहे त्या साठी मार्गदर्शन नसल्याने आयुष्यात जे कधी मिळत जाते त्यात समाधान मानात असतो. नोकरी म्हणजे आपल्याला पुढे काहीतरी भेटेल या आशेने आपण करत असलेली तडजोड असते. सध्या पगार कमी आहे नंतर वाढेल पुढे साहेब चांगला आहे शिकायला भेटत एका ना अशी खूप वाक्य आपण अनेक जणांकडून ऐकत असतो.आणि मग वर्षाला हजार वाढतात म्हणून तीच नोकरी आयुष्यभर करत राहतो..एकदा का संसाराच्या गाड्यात अडकला कि ती नोकरी म्हणजे सर्वस्व उरतं.जास्त पगाराच्या नोकरीसाठी जुनी नोकरी सोडून नवी शोधू शकत नाही करणं नवी नोकरी मिळेल याची शास्वती नाही.जगण्याच्या एका रुटिंगची सवय झाली ती बदलण्याची भीती मनात असतेच. त्यातून बाहेर पडणं कठीण असत.
खरंतर आपण जेव्हा कॉलेज संपून बाहेर पडतो तेव्हा आपण काय बनायचं हे ठरलेलं असलं पाहिजे.कोणत्या क्षेत्रात जायचं याची प्लांनिंग ठरलेली असली तर नक्की आपण आपलं ध्येय गाठू शकतो..
तुर्ताच.थांबतो आणि इतकंच सांगू इच्छितो
"प्रेत्यक व्यक्ती बॉम्ब सारखी असते
फक्त त्याची पिन काढायची गरज असते ".
आपल्यात खूप काही बनण्याची क्षमता असते
पण आपण काय बनत असतो हेच आपल्याला लक्षत येत नाही..
:-धान्यवाद
ⓒPrakash
खरंतर आपण जेव्हा कॉलेज संपून बाहेर पडतो तेव्हा आपण काय बनायचं हे ठरलेलं असलं पाहिजे.कोणत्या क्षेत्रात जायचं याची प्लांनिंग ठरलेली असली तर नक्की आपण आपलं ध्येय गाठू शकतो..
तुर्ताच.थांबतो आणि इतकंच सांगू इच्छितो
"प्रेत्यक व्यक्ती बॉम्ब सारखी असते
फक्त त्याची पिन काढायची गरज असते ".
आपल्यात खूप काही बनण्याची क्षमता असते
पण आपण काय बनत असतो हेच आपल्याला लक्षत येत नाही..
:-धान्यवाद
ⓒPrakash
सोमवार, ६ एप्रिल, २०२०
विचार
काहींच्या वस्तू ब्रॅण्डेड असतात
तर काहींचे विचार
वस्तू वापरल्या जातात
विचार आत्मसात केले जातात
वस्तू संपून जातील
चांगले विचार कायम सोबत राहतील
माणसं ही आजकाल सोडून जातात
स्वतःच स्वार्थ साधला की
विचारांचं तस नसतं ते नेहमी आपल्याला साथ देतात आपल्या सोबत असतात.
या जगात वावरण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी..
तर काहींचे विचार
वस्तू वापरल्या जातात
विचार आत्मसात केले जातात
वस्तू संपून जातील
चांगले विचार कायम सोबत राहतील
माणसं ही आजकाल सोडून जातात
स्वतःच स्वार्थ साधला की
विचारांचं तस नसतं ते नेहमी आपल्याला साथ देतात आपल्या सोबत असतात.
या जगात वावरण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी..
गावाचं गावपण
तुम्हीच सांगा आता आमच्या गावाचं गाव पण कुठे गेलं!
आज तीस वर्षे झाली लहानपणापासून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीना बारकाईने बघत आलोय आपला गाव आपली शेती बैलगाडी सायकल आणि एसटी म्हणजे अताचा लाल डबा आता आपल्यासाठी तो लालडबा झालाय पण एक पंधरा वीस वर्षांपूर्वी तो आपल्याला शहराकडे घेऊन जाण्याचा एकमेव साधन होती. असो आज असं विचार करतोय की
आपला गाव कसा हळूहळू बदलत गेला. सगळेच लोकं शेती करत होते कुडाची घरे तर काही कौलची घरे त्यात नंतर सिमेंटचे पत्रांची घरे आली पण आता ती ही कमी होत चालली आहेत आता सिमेंटचा स्लाप झालाय बिल्डिंग आल्यात कारण "शेतकऱ्याला जमिनीचा पैसा पण आलाय."
सगळ्यात गावाला नैसर्गिक सुंदर होत आंबे जांभळी करवंदे बोरे असे कित्येक झाडे होते नैसर्गिक सौंदर्य खूप होता. झाडाच्या सावलीत म्हातारा आजोबा सहज झोपी जात होते. आज बंद खोलीत एसी असून सुद्धा काहींना झोप लागत नाही.
विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पांसाठी गेल्या काही ठिकाणी प्रकल्पही उभारले एमआयडीसी सिडको असे अनेक प्रकल्प आज शेतकऱ्यांच्या जीवावर आले त्यांच्या जमिनी हस्तांतरित केला आणि इथला शेतकरी भूमिहीन झाला जी काही थोडीफार जमीन उरली आहे त्यातही आज नैना आली आहे navi mumbai influence notified area (NAINA) त्यांनी उरलेली जमीन घेण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना पूर्णता भूमिहीन करण्याचा जणूकाही कट रचला आहे असा विकासाच्या नावावर इथल्या स्थानिकांच्या जमिनी प्रकल्पांना जात आहेत. ज्या जमिनीवर इथला भूमिपुत्र वर्षानुवर्ष शेती करत होता व आपली उपजीविका करत होता.. खूप जण म्हणत असतात जुना काळ कसा होता खरच जुना काळ बराच होता कारण त्यावेळी घरात एकी होती गावात एकी होती आणि समाजातही एकी होती पण आता बदल होत गेला आणि माणस स्वार्थी होत गेली. इतके बदल झाले. मातीच्या घराच्या भिंतींना ओलावा होता तसाच ओलावा त्या काळातल्या माणसाच्या नात्यांनाही होता.पण सिमेंटच्या घरांप्रमाणेच काडक कठोर झाली आहेत.
गावात जर कोणी आजारी असेल तर पूर्ण गाव त्यांना पाहण्यासाठी येत होता. पण काळ बदलला आता कुणी मेला तरी पाण्यासाठी जात नाही आपल्याला काय करायचंय आहे ते बघून घेतील अशी वृत्ती झाली आहे.
असं गावात राहिला नाही जिथे माणसात माणुसकी होती आणि सर्व माणसेही सुखी होती....
म्हणून म्हणावं वाटलं
"सिमेंटच्या जंगलानी हिरवळीवर राज्य केलं"
"तुम्हीच सांगा आता आमच्या गावाचं गाव पण कुठे गेलं!"
ⓒPrakash
रविवार, ५ एप्रिल, २०२०
मी मनातला !
मी मनातला ! खरंतर प्रत्येक जण स्वतःच्या मनात स्वतःच एक वेगळं अस्तित्व घेऊन जगात असतो.कधी ना कधी एकांतात बसून जगण्यापलीकडे एक विचार करत असतो.ब्लॉग सर्वांना वाचण्यासाठी बनवला आहे आणि वाचणारा प्रेत्यक जण हा एक रसिक आहे...आणि म्हणून त्या प्रेत्यक रसिकास सादर करतो..मी मनातला ..आणि म्हणून मी मनातला टायटल दिल आहे ..
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)