गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

स्वार्थी माणसा

तु असा कसा होत चाललास 
माझं माझं करता करता तू
आपली नाती तू विसरत चाललास
सुखाच्या मागे धावता धावता
आपल्यांची दुःख विसरत चाललास
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
पैसा भरपूर कमविलास 
तो कमविताना तू खूप स्वार्थी झालास 
तुझं माझं करता करता तू असा कसा झालास 
आपल्यानंच विसरून गेलास 
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
अजूनही वेळ आहे 
तुझ्यातल्या माणसाला हरवून देऊ नकोस
फक्त एकच सांगेल या कवितेतून तुला  
सुख कायम नाही
महत्व दे नात्याला 
नातीच साथ देतील
आयुष्यभर आपल्याला....

ⓒPrakash