सोमवार, १ जून, २०२०

आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक


आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक आपले व्यवसाय मिठागरे मासळी दूध भाजी चे मळे गवंडी काम (मेस्त्री) गरजेच्या च्या  वस्तूची दुकाने  इत्यादी येत्या ५० वर्षात परिस्थिती खूप बदलली आमचा व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे लागलो आणि याच व्यवसायात परकीय येऊ लागले बंद झालेली आमची व्यवसायिक वृत्ती पुन्हा सुरू करावी लागेल अन्यथा परिस्थितीत खूप गंभीर होऊ शकते आपले स्थानिक उ्योगांना पुन्हा चालना देणे गरजेचे आहे...सरकारी प्रकऌप या मुले आपले  मूळ व्यवसाय बंद पडले जमिनी गेल्या आणि आमचा शेती भाजीचे मळे दुध आणि इतर जोड उद्योग कमी झाले मला वाटतं आमच्या आजोबा पासून ची पिढी नोकरी कडे वळली असेल त्यांचा व्यवसाय होता दूध उद्योग आणि भाजीचे मळे नोकरी करता करता मुलांच्या मनात नोकरी रुजली ते कळलेच नाही आणि मग आपणही  तेच करू लागलो मग शेती कडे कमी लक्ष्य दिले गेले त्याला जोड होती पशुपालन दूध उद्योग गायी म्हशी विकल्या जाऊ लागल्या. जणू मूळ आमची व्यवसायिक वृत्ती कुणीतरी  हिरावून घेतली गेली. मुळात उद्योगाचे मूळ आम्ही आणि आज आम्हीच नोकरीचे झाड होत आहेत..पण त्याला आता व्यवसायाच्या वटवृक्षात रूपांतर करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण समाजात एकी करून एकमेकांना प्रोसहित करणे गरजेचे आहे तरच आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते अनाथ काळ कठीण आहेच परिस्थिती हता बाहेर जाण्याआधी वेळीच सावधान झालेले योग्य आहे नाहीतर इतर समाज्याचा धंद्यात आपल्याला नोकरी करावी लागेल ...
ⓒPrakash

कोरोना कसला हा आजार

 कोरोना
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
अफवा आहेत हजार
आणि लोक झालेत बेजार
लॉक डाऊन मध्ये होत आहे वाढ
लॉक डाऊन एक दोन तीन चार
घरात बसून मात्र लोकं झालीत बेजार 
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
रोज वाढत आहे रुग्णांचा जोर 
दवाखाने होत आहेत कमजोर 
सरकार करतोय आपली चिंता
पण सुविधांचा होत आहे इथे गुंता 
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
सगळीकडून होत आहे मदतीचा हातभार
त्यांचे मानले पाहिजेत हतजोडून आभार 
कसला हा आजार 
मांडलाय नुसता बाजार
बस मला एकाच प्रश्न पडलाय 
कुठे गेलेत बाकीचे आजार
ⓒPrakash