कोरोना
कसला हा आजार कि
मांडलाय नुसता बाजार
अफवा आहेत हजार
आणि लोक झालेत बेजार
लॉक डाऊन मध्ये होत आहे वाढ
लॉक डाऊन एक दोन तीन चार
घरात बसून मात्र लोकं झालीत बेजार
कसला हा आजार कि
मांडलाय नुसता बाजार
रोज वाढत आहे रुग्णांचा जोर
दवाखाने होत आहेत कमजोर
सरकार करतोय आपली चिंता
पण सुविधांचा होत आहे इथे गुंता
कसला हा आजार कि
मांडलाय नुसता बाजार
त्यांचे मानले पाहिजेत हतजोडून आभार
कसला हा आजार
मांडलाय नुसता बाजार
बस मला एकाच प्रश्न पडलाय
कुठे गेलेत बाकीचे आजार
ⓒPrakash