1)आठवणींचा तुझ्या
काळजाला स्पर्श होतो.
आठवणीत तुझ्या प्रेमाचा
मलाही मग हर्ष होतो.
2)अधीन झालोय मी
स्वाधीन झालोय मी.
मी तिच्या प्रेमाचा
बाधित झालोय मी.
3) पहिल्यांदा पाहशील
रागणेच पाहशील.
मग इतक जवळची हो
की मनातलं ओळखशील.
4)उतरव तू चस्मा
वेगवेगळ्या रंगाचा.
सांग आता धर्म कोणता
आकाशाचा आणि सूर्याचा.
5)भेटणार्यांना भेटण्याची
कारणे खूप असतात.
आणि न भेटणार्यांना ती
द्यायची नसतात.