मी मनातला

मी मनातला ! खरंतर प्रत्येक जण स्वतःच्या मनात स्वतःच एक वेगळं अस्तित्व घेऊन जगात असतो.कधी ना कधी एकांतात बसून जगण्यापलीकडे एक विचार करत असतो. त्या विचारांना जोड म्हणुन हा ब्लॉग

बुधवार, १ जुलै, २०२०

थोडं थांबलोय

on जुलै ०१, २०२०
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ

जे काही सुचत मनात येत ते ब्लॉगच्या माध्यामातुन मांडण्याचा एक प्रयत्न करतोय.

  • Home
  • ►  2022 (1)
    • ►  जानेवारी 30 - फेब्रुवारी 6 (1)
  • ▼  2020 (29)
    • ►  डिसेंबर 13 - डिसेंबर 20 (3)
    • ►  जुलै 12 - जुलै 19 (1)
    • ►  जुलै 5 - जुलै 12 (1)
    • ▼  जून 28 - जुलै 5 (2)
      • पायी चालतो मी विठूचा वारकरी
      • थोडं थांबलोय
    • ►  जून 21 - जून 28 (2)
    • ►  जून 14 - जून 21 (2)
    • ►  मे 31 - जून 7 (2)
    • ►  मे 3 - मे 10 (1)
    • ►  एप्रिल 26 - मे 3 (2)
    • ►  एप्रिल 19 - एप्रिल 26 (1)
    • ►  एप्रिल 12 - एप्रिल 19 (2)
    • ►  एप्रिल 5 - एप्रिल 12 (10)

गैरवर्तनाची तक्रार करा

मी मनातला

मी मनातला

बुधवार, २४ जून, २०२०

आमचं टॅलेंट

साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं ध्येय
तुमच्या या नोकरीत राख  झालं
फास्ट सेकंड नाईट 
करता करता तुमचं काम झाक झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
तुमची कामे करता करता 
माझ्या आयुष्यच सगळ्यांकडून
मोजमाप झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
प्रमोशन डोळ्यासमोर ठेवून 
इथंच करियर आहे हे मनात आला
थोड्या प्रशंसेल भुलून साहेब साहेब केलं
तरीपण  काढून टाका याना अस मनात तुमचा आले
साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं स्वप्न राख झालं
अरे मीच तो हरामखोर कामगार 
इवल्याश्या नोकरीत समाधान मानुन
स्वतःच्या ध्येयला विसरून आज म्हणतो
साहेब माझं टॅलेंट खाक झालं
मनाशी बाळगले स्वप्न राख झालं

- जून २४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

रविवार, १४ जून, २०२०

स्वतःवर विश्वास असेल तर ?

आपला विश्वास स्वतःवर नसतो स्वतःवर विश्वास असता तर मनात आणलेली प्रत्येक गोष्ट खरी करण्याची ताकद आपल्यात असते आणि ती गोष्ट खरी करून दाखवली असती. पण आपलं तसं नसत.जेव्हा आपण असं  करू तेव्हा नक्कीच यशस्वी होऊ शकतो.मनात खूप कल्पना असतात पण त्या प्रत्यक्षात आणताना खूप अडचणी येतात  त्या अडचणी कश्या दूर करायच्या  व त्यासाठी काय उपाय करता येतील जेणेकरून आपलया  मनातील कल्पना आपली ध्येय  प्रत्यक्षात आणता येतील.  हे शोधणं  गरजेचं आहे. 
 नवीन काही तरी करण्याची प्रेत्यकाची  इच्छा असते पण अंमलबजावणी करण्याची वेळ येते तेव्हा मग घरातले शेजारचे गावातले काय बोलतील हा एका प्रश्न समोर उभा राहतो आणि या प्रश्नात आपण जर अडकलो कि काय करावं हेच काळात नाही आणि मग आपण समोर येईल ते मिळेल ते करत असतो  .आजकालची तरुण पिढी नवीन इनोवेशन मध्ये मागे पडत आहे. जगात काय चालू आहे कोणत्या क्षेत्रात संधी आहे त्यात आपण काय करू शकतो आपल्या स्वतःची आवड काय आहे आपल्याला काय करायला जमेल याचा शोध घेतला पाहिजे स्वतःवर विश्वास असेल तर हे नक्की करू शकतो या साठी त्यांना घरातून प्रोचाहन दिलं  पाहिजे शालेय शिक्षणा सोबत व्यवसायिक शिक्षण घेणं हे महत्वाचं आहे. 
म्हणून म्हणावं वाटत की इतरापेक्ष्या स्वतःवर विश्वास ठेवावा आणि ध्येय प्राप्ती साठी प्रयत्न करावं. इतरांचा विश्वास तुमच्या वर असेल तर तुम्ही फक्त नोकरीच करू शकता स्वतःवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नोकरी निर्माण करु शकता..
- जून १४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

चारोळ्या ४

1)स्वतःबद्दल एखाद्याला
खूप काही सांगून जातो आपण.
खरोखर तितके
खरे असतो का आपण . . .

2)प्रेत्यक व्यक्तीची 
एक कथा असते.
काही व्यक्तीसाठी
ती व्यथा असते...

- जून १४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

सोमवार, १ जून, २०२०

आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक


आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक आपले व्यवसाय मिठागरे मासळी दूध भाजी चे मळे गवंडी काम (मेस्त्री) गरजेच्या च्या  वस्तूची दुकाने  इत्यादी येत्या ५० वर्षात परिस्थिती खूप बदलली आमचा व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे लागलो आणि याच व्यवसायात परकीय येऊ लागले बंद झालेली आमची व्यवसायिक वृत्ती पुन्हा सुरू करावी लागेल अन्यथा परिस्थितीत खूप गंभीर होऊ शकते आपले स्थानिक उ्योगांना पुन्हा चालना देणे गरजेचे आहे...सरकारी प्रकऌप या मुले आपले  मूळ व्यवसाय बंद पडले जमिनी गेल्या आणि आमचा शेती भाजीचे मळे दुध आणि इतर जोड उद्योग कमी झाले मला वाटतं आमच्या आजोबा पासून ची पिढी नोकरी कडे वळली असेल त्यांचा व्यवसाय होता दूध उद्योग आणि भाजीचे मळे नोकरी करता करता मुलांच्या मनात नोकरी रुजली ते कळलेच नाही आणि मग आपणही  तेच करू लागलो मग शेती कडे कमी लक्ष्य दिले गेले त्याला जोड होती पशुपालन दूध उद्योग गायी म्हशी विकल्या जाऊ लागल्या. जणू मूळ आमची व्यवसायिक वृत्ती कुणीतरी  हिरावून घेतली गेली. मुळात उद्योगाचे मूळ आम्ही आणि आज आम्हीच नोकरीचे झाड होत आहेत..पण त्याला आता व्यवसायाच्या वटवृक्षात रूपांतर करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण समाजात एकी करून एकमेकांना प्रोसहित करणे गरजेचे आहे तरच आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते अनाथ काळ कठीण आहेच परिस्थिती हता बाहेर जाण्याआधी वेळीच सावधान झालेले योग्य आहे नाहीतर इतर समाज्याचा धंद्यात आपल्याला नोकरी करावी लागेल ...


- जून ०१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

कोरोना कसला हा आजार

 कोरोना
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
अफवा आहेत हजार
आणि लोक झालेत बेजार
लॉक डाऊन मध्ये होत आहे वाढ
लॉक डाऊन एक दोन तीन चार
घरात बसून मात्र लोकं झालीत बेजार 
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
रोज वाढत आहे रुग्णांचा जोर 
दवाखाने होत आहेत कमजोर 
सरकार करतोय आपली चिंता
पण सुविधांचा होत आहे इथे गुंता 
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
सगळीकडून होत आहे मदतीचा हातभार
त्यांचे मानले पाहिजेत हतजोडून आभार 
कसला हा आजार 
मांडलाय नुसता बाजार
बस मला एकाच प्रश्न पडलाय 
कुठे गेलेत बाकीचे आजार






- जून ०१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

गुरुवार, ७ मे, २०२०

फिरत आहे बाहेर कोरोनाचे राक्षस

नको बाहेर कुठे इकडे तिकडे सगळीकडेच फिरत आहे हे राक्षस आज मनात भीती निर्माण झाली कोरोनाची वारी आमच्या जवळपास आली सूरवात चीनमध्ये झाली अशी कशी महामारी आली हॉस्पिटल थकले डॉक्टर थकले थकले सारे जग हे देवा तूच आता आमचे कडे बघ उपाय एकाच आहे स्वतःच स्वतःची काळजी घेणे आणि घरात बसून राहणे


- मे ०७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

The state of boyfriend and girlfriend caused by Corona

The state of boyfriend and girlfriend caused by Corona

It's been a long day
The two have not met
No talking face to face.
Everything is on the phone all night long
No more paperwork
Living online
Love is now virtual
Chatting is everything
The setting is love
Status keeping means
To express feelings
Both are working
Pine for each other ..
Just stop  Corona
Let us meet each other now
It's been a long day
The two have not met
No talking face to face.
 

- एप्रिल ३०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

कोरोना मुळे झालेली प्रियकर आणि प्रियसी ची अवस्था


खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही 
समोर समोर बोलणं नाही.
फोनवरच असतं सगळं रात्र रात्र 
आता नाहीत ती कागदी पत्र
ऑनलाईन झालाय जगणं
व्हर्चुअल झालाय आता प्रेम
चॅटिंग म्हणजे सगळं असतं 
सेटिंग म्हणजे प्रेम 
स्टेटस ठेवण म्हणजे
भावना व्यक्त करणं
दोघांच चाललंय 
एकमेकांसाठी झुरणं.. 
बस संपूदे हा कोरोना  
आम्हाला एकमेकांना आता भेटू दे 
खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही 
समोर समोर बोलणं नाही.






- एप्रिल २७, २०२० 1 टिप्पणी:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

स्वार्थी माणसा

तु असा कसा होत चाललास 
माझं माझं करता करता तू
आपली नाती तू विसरत चाललास
सुखाच्या मागे धावता धावता
आपल्यांची दुःख विसरत चाललास
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
पैसा भरपूर कमविलास 
तो कमविताना तू खूप स्वार्थी झालास 
तुझं माझं करता करता तू असा कसा झालास 
आपल्यानंच विसरून गेलास 
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
अजूनही वेळ आहे 
तुझ्यातल्या माणसाला हरवून देऊ नकोस
फक्त एकच सांगेल या कवितेतून तुला  
सुख कायम नाही
महत्व दे नात्याला 
नातीच साथ देतील
आयुष्यभर आपल्याला....
आयुष्भर आपल्याला....
- एप्रिल २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

चांगले विचार

एका पुस्तकात वाचलेले काही चांगले विचार 

१)एखाद्या कामात अपयशी ठरणं  अशक्य आहे असे समजून काम करावे. 
२)कठीण काळ जास्त वेळ राहत नाही पण मजबूत खंबीर माणूस जास्त वेळ टिकून राहतो .
३)भाग्य त्यांची  साथ देतो जे स्वतःच्या कामात गुंततात आणि मगच देवाची मदत मागतात.
४)पेनाची ताकद तलवारी पेक्षा जास्त असते. 
५)आपला वेळ आणि पैसे दोन्हीही जपून खर्च करावा. 
६)पतंग वाऱ्या बरोबर नव्हे तर त्याच्या विरुद्ध वर जाते. 
७)कोणताही गुंता काढण्यासाठी त्याची प्रथम सुरवात करावी लागते.
८)व्यापार सायकली प्रमाणे असतो चालवत राहा नाहीतर पडून जा .
९)समस्या बदल विचार करण्यापेक्षा संधी बद्दल विचार करणे अधिक चांगले .
१०)माश्याने जर तोंड बंद ठेवले तर तो कधी पेचात सापडणार नाही
- एप्रिल १३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!Twitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)

आमचं टॅलेंट

साहेब आमचं टॅलेंट खाक झालं मनाशी बालगलेलं ध्येय तुमच्या या नोकरीत राख  झालं फास्ट सेकंड नाईट  करता करता तुमचं काम झाक झालं पण आमचं टॅलेंट खा...

  • कोरोना मुळे झालेली प्रियकर आणि प्रियसी ची अवस्था
    खुप दिवस झाले दोघांची भेट नाही  समोर समोर बोलणं नाही. फोनवरच असतं सगळं रात्र रात्र  आता नाहीत ती कागदी पत्र ऑनलाईन झालाय ...
  • आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक
    आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक आपले व्यवसाय मिठागरे मासळी दूध भाजी चे मळे गवंडी काम (मेस्त्री) गरजेच्या च्या  वस्तूची ...
  • ध्येय ठरवा आणि ते मिळावा
    खरंतर प्रत्येकात काही तरी बनण्याची क्षमता असते.शैक्षणिक जीवनात काय बनायचं आहे हे निश्चित करणं गरजेचं असत.या साठी घरातील वातावरण आणि योग्य...

हा ब्लॉग शोधा

जे काही सुचत मनात येत ते ब्लॉगच्या माध्यामातुन मांडण्याचा एक प्रयत्न करतोय.

  • Home

दुरुपयोग नोंदवा

ब्लॉग संग्रहण

  • ▼  2020 (21)
    • ▼  जून 21 - जून 28 (1)
      • आमचं टॅलेंट
    • ►  जून 14 - जून 21 (2)
    • ►  मे 31 - जून 7 (2)
    • ►  मे 3 - मे 10 (1)
    • ►  एप्रिल 26 - मे 3 (2)
    • ►  एप्रिल 19 - एप्रिल 26 (1)
    • ►  एप्रिल 12 - एप्रिल 19 (2)
    • ►  एप्रिल 5 - एप्रिल 12 (10)
साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.

जे काही सुचत मनात येत ते ब्लॉगच्या माध्यामातुन मांडण्याचा एक प्रयत्न करतोय.

  • Home

हा ब्लॉग शोधा

लोकप्रिय पोस्ट

  • फिरत आहे बाहेर कोरोनाचे राक्षस
    नको बाहेर कुठे इकडे तिकडे सगळीकडेच फिरत आहे हे राक्षस आज मनात भीती निर्माण झाली कोरोनाची वारी आमच्या जवळपास आली सूरवात चीनमध्ये झाली अशी क...
  • कोरोना कसला हा आजार
     कोरोना कसला हा आजार कि  मांडलाय नुसता बाजार अफवा आहेत हजार आणि लोक झालेत बेजार लॉक डाऊन मध्ये होत आहे वाढ लॉक डाऊन एक दोन ...
  • स्वार्थी माणसा
    तु असा कसा होत चाललास  माझं माझं करता करता तू आपली नाती तू विसरत चाललास सुखाच्या मागे धावता धावता आपल्यांची दुःख विसरत चाललास ...
साधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.