मंगळवार, ७ जुलै, २०२०

मस्त पाऊस होता

मस्त पाऊस होता
पण मी भिजले नाही
सोबत तू नाहीस
हेच मनाला रिझले नाही ।।
वट पहाते तुझी तू येणार
पण तू हि पावसासारखा
कधी वेळेवर येत नाही
पावसाच ठीक आहे ।।
पण तू वेळेवर ये
मला सोबत घे
मग आपण दोघेही पाऊसात
चिंब होऊन जाऊ
आपल्या प्रेमाचं गीत गाऊ
पण ! तूच सोबत नाहीस
म्हणून मी भिजले नाही
अश्रू लपवून मनात
रडणेही मला जमले नाही ।।
मस्त पाऊस होता
पण मी भिजले नाही

ⓒPrakash