मी मनातला ! खरंतर प्रत्येक जण स्वतःच्या मनात स्वतःच एक वेगळं अस्तित्व घेऊन जगात असतो.कधी ना कधी एकांतात बसून जगण्यापलीकडे एक विचार करत असतो. त्या विचारांना जोड म्हणुन हा ब्लॉग
बुधवार, १ जुलै, २०२०
शनिवार, २७ जून, २०२०
काळ
भूतकाळ भविष्य काळाला भेटला
मग मी कसा आणि तू कसा असशील
मग मी कसा आणि तू कसा असशील
असे प्रश्न निर्माण होऊ लागले
वर्तमान गप्प उभा होता आता कसा जगायचं या प्रश्नात
भूतकाळ चांगला होता त्यात भविष्याची चिंता दिसत नव्हती
तो जगून गेला होता वर्तमान चिंतेत होता तो भविष्यात कसा जगायचं या ?
वर्तमान गप्प उभा होता आता कसा जगायचं या प्रश्नात
भूतकाळ चांगला होता त्यात भविष्याची चिंता दिसत नव्हती
तो जगून गेला होता वर्तमान चिंतेत होता तो भविष्यात कसा जगायचं या ?
ⓒPrakash
बुधवार, २४ जून, २०२०
आमचं टॅलेंट
साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं ध्येय
तुमच्या या नोकरीत राख झालं
फास्ट सेकंड नाईट
करता करता तुमचं काम झाक झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
तुमची कामे करता करता
माझ्या आयुष्यच सगळ्यांकडून
मोजमाप झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
प्रमोशन डोळ्यासमोर ठेवून
इथंच करियर आहे हे मनात आला
थोड्या प्रशंसेल भुलून साहेब साहेब केलं
तरीपण काढून टाका याना अस मनात तुमचा आले
साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं स्वप्न राख झालं
अरे मीच तो हरामखोर कामगार
इवल्याश्या नोकरीत समाधान मानुन
स्वतःच्या ध्येयला विसरून आज म्हणतो
साहेब माझं टॅलेंट खाक झालं
मनाशी बाळगले स्वप्न राख झालं
ⓒPrakash
रविवार, १४ जून, २०२०
स्वतःवर विश्वास असेल तर ?
आपला विश्वास स्वतःवर नसतो.स्वतःवर विश्वास असता तर मनात आणलेली प्रत्येक गोष्ट खरी करण्याची ताकद आपल्यात असते. आणि ती गोष्ट खरी करून दाखवली असती. पण आपलं तसं नसत.जेव्हा आपण असं करू तेव्हा नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
मनात खूप कल्पना असतात पण त्या प्रत्यक्षात आणताना खूप अडचणी येतात त्या अडचणी कश्या दूर करायच्या व त्यासाठी काय उपाय करता येतील जेणेकरून आपलया मनातील कल्पना आपली ध्येय प्रत्यक्षात आणता येतील. हे शोधणं गरजेचं आहे.
नवीन काही तरी करण्याची प्रेत्यकाची इच्छा असते पण अंमलबजावणी करण्याची वेळ येते. तेव्हा मग घरातले शेजारचे गावातले काय बोलतील हा एका प्रश्न समोर उभा राहतो आणि या प्रश्नात आपण जर अडकलो कि काय करावं हेच काळात नाही आणि मग आपण समोर येईल. ते मिळेल ते करत असतो .आजकालची तरुण पिढी नवीन इनोवेशन मध्ये मागे पडत आहे.
जगात काय चालू आहे कोणत्या क्षेत्रात संधी आहे त्यात आपण काय करू शकतो आपल्या स्वतःची आवड काय आहे. आपल्याला काय करायला जमेल याचा शोध घेतला पाहिजे. स्वतःवर विश्वास असेल तर हे नक्की करू शकतो या साठी त्यांना घरातून प्रोचाहन दिलं पाहिजे. शालेय शिक्षणा सोबत व्यवसायिक शिक्षण घेणं हे महत्वाचं आहे.
म्हणून म्हणावं वाटत की इतरापेक्ष्या स्वतःवर विश्वास ठेवावा आणि ध्येय प्राप्ती साठी प्रयत्न करावं. इतरांचा विश्वास तुमच्या वर असेल तर तुम्ही फक्त नोकरीच करू शकता स्वतःवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नोकरी निर्माण करु शकता..
ⓒPrakash
चारोळ्या ४
1)स्वतःबद्दल एखाद्याला
खूप काही सांगून जातो आपण.
खरोखर तितके
खरे असतो का आपण . . .
2)प्रेत्यक व्यक्तीची
एक कथा असते.
काही व्यक्तीसाठी
ती व्यथा असते...
ⓒPrakash
सोमवार, १ जून, २०२०
आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक
कोरोना कसला हा आजार
कोरोना
कसला हा आजार कि
मांडलाय नुसता बाजार
अफवा आहेत हजार
आणि लोक झालेत बेजार
लॉक डाऊन मध्ये होत आहे वाढ
लॉक डाऊन एक दोन तीन चार
घरात बसून मात्र लोकं झालीत बेजार
कसला हा आजार कि
मांडलाय नुसता बाजार
रोज वाढत आहे रुग्णांचा जोर
दवाखाने होत आहेत कमजोर
सरकार करतोय आपली चिंता
पण सुविधांचा होत आहे इथे गुंता
कसला हा आजार कि
मांडलाय नुसता बाजार
त्यांचे मानले पाहिजेत हतजोडून आभार
कसला हा आजार
मांडलाय नुसता बाजार
बस मला एकाच प्रश्न पडलाय
कुठे गेलेत बाकीचे आजार
ⓒPrakash
गुरुवार, ७ मे, २०२०
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
The state of boyfriend and girlfriend caused by Corona
The state of boyfriend and girlfriend caused by Corona
It's been a long day
The two have not met
No talking face to face.
Everything is on the phone all night long
No more paperwork
Living online
Love is now virtual
Chatting is everything
The setting is love
Status keeping means
To express feelings
Both are working
Pine for each other ..
Just stop Corona
Let us meet each other now
It's been a long day
The two have not met
No talking face to face.
सोमवार, २७ एप्रिल, २०२०
कोरोना मुळे झालेली प्रियकर आणि प्रियसी ची अवस्था
खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही
समोर समोर बोलणं नाही.
फोनवरच असतं सगळं रात्र रात्र
आता नाहीत ती कागदी पत्र
ऑनलाईन झालाय जगणं
व्हर्चुअल झालाय आता प्रेम
चॅटिंग म्हणजे सगळं असतं
सेटिंग म्हणजे प्रेम
स्टेटस ठेवण म्हणजे
भावना व्यक्त करणं
दोघांच चाललंय
एकमेकांसाठी झुरणं..
बस संपूदे हा कोरोना
आम्हाला एकमेकांना आता भेटू दे
खुप दिवस झाले
गुरुवार, २३ एप्रिल, २०२०
स्वार्थी माणसा
तु असा कसा होत चाललास
माझं माझं करता करता तू
आपली नाती तू विसरत चाललास
सुखाच्या मागे धावता धावता
आपल्यांची दुःख विसरत चाललास
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
पैसा भरपूर कमविलास
तो कमविताना तू खूप स्वार्थी झालास
तुझं माझं करता करता तू असा कसा झालास
आपल्यानंच विसरून गेलास
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
अजूनही वेळ आहे
तुझ्यातल्या माणसाला हरवून देऊ नकोस
फक्त एकच सांगेल या कवितेतून तुला
सुख कायम नाही
महत्व दे नात्याला
नातीच साथ देतील
आयुष्यभर आपल्याला....
ⓒPrakash
सोमवार, १३ एप्रिल, २०२०
चांगले विचार
एका पुस्तकात वाचलेले काही चांगले विचार
१)एखाद्या कामात अपयशी ठरणं अशक्य आहे असे समजून काम करावे.
२)कठीण काळ जास्त वेळ राहत नाही पण मजबूत खंबीर माणूस जास्त वेळ टिकून राहतो .
३)भाग्य त्यांची साथ देतो जे स्वतःच्या कामात गुंततात आणि मगच देवाची मदत मागतात.
४)पेनाची ताकद तलवारी पेक्षा जास्त असते.
५)आपला वेळ आणि पैसे दोन्हीही जपून खर्च करावा.
६)पतंग वाऱ्या बरोबर नव्हे तर त्याच्या विरुद्ध वर जाते.
७)कोणताही गुंता काढण्यासाठी त्याची प्रथम सुरवात करावी लागते.
८)व्यापार सायकली प्रमाणे असतो चालवत राहा नाहीतर पडून जा .
९)समस्या बदल विचार करण्यापेक्षा संधी बद्दल विचार करणे अधिक चांगले .
१०)माश्याने जर तोंड बंद ठेवले तर तो कधी पेचात सापडणार नाही
रविवार, १२ एप्रिल, २०२०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




