सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

 कमी तापवलं तर

'नासण्याची' भीती असते.
आणि खूपच जास्त उकळलं,
तर दूधच 'करपून' जाते.
'मनाचं भांडं' ही
एवढंच 'गरम' होऊ द्यावं,
'उतू' जाण्याची लक्षणे दिसली,
की लगेच 'शांत' व्हावं!..
©अज्ञात

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

note 19122020

 मला वाटतं आयुष्यात वेटींग पिरियड कधीच नसतो जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही आधीचा काळ म्हणजे वेटींग पिरियड 

note 19122020

 If you do not travel,

If you do not read,

If you do not listen to the sounds of life,

You start dying slowly

सूर्याला मागे सोडून मी पुढे पळत होतो

 सूर्याला मागे सोडून मी पुढे पळत होतो संध्याकाळ झाली आणि सूर्य माझ्याजवळ आला आणि हळूच म्हणाला रात्र होईल आता पुन्हा पाहायचं आहे उद्या पुन्हा पळायच आहे आयुष्यासाठी आपल्याला जायचं आहे असच लढायचं आहे

मंगळवार, ७ जुलै, २०२०

मस्त पाऊस होता

मस्त पाऊस होता
पण मी भिजले नाही
सोबत तू नाहीस
हेच मनाला रिझले नाही ।।
वट पहाते तुझी तू येणार
पण तू हि पावसासारखा
कधी वेळेवर येत नाही
पावसाच ठीक आहे ।।
पण तू वेळेवर ये
मला सोबत घे
मग आपण दोघेही पाऊसात
चिंब होऊन जाऊ
आपल्या प्रेमाचं गीत गाऊ
पण ! तूच सोबत नाहीस
म्हणून मी भिजले नाही
अश्रू लपवून मनात
रडणेही मला जमले नाही ।।
मस्त पाऊस होता
पण मी भिजले नाही

ⓒPrakash

बुधवार, १ जुलै, २०२०

पायी चालतो मी विठूचा वारकरी


तुझ्या नामाच्या गजरात
गुंग होते दुनिया सारी ।।
पायी चालतो मी विठूचा वारकरी

ना विसरलो कधी भक्ती 
ना चुकली कधी वारी ।।
पायी चालतो मी विठूचा वारकरी

नाम घेतो विठ्ठलाचे जयघोष करी 
राम कृष्णा हरी राम कृष्णा हरी ।।
पायी चालतो मी विठूचा वारकरी

अशी कशी हि रोगराई अली
ज्याने चुकवली तुझ्या भक्ताची वारी।।

आज मानातूनच निघाली विठुराया तुझी वारी 
एकाच विनवणी करतो घालाव हि महामारी ।।
ज्याने चुकवली तुझी वारी!!
पायी चालतो मी विठूचा वारकरी

ⓒPrakash
पायी चालतो मी विठूचा वारकरी


थोडं थांबलोय

शनिवार, २७ जून, २०२०

काळ


भूतकाळ भविष्य काळाला भेटला 
मग मी कसा आणि तू कसा असशील
असे प्रश्न निर्माण होऊ लागले 
वर्तमान गप्प उभा होता आता कसा जगायचं या प्रश्नात
भूतकाळ चांगला होता त्यात भविष्याची चिंता दिसत नव्हती 
तो जगून गेला होता वर्तमान चिंतेत होता तो भविष्यात कसा जगायचं या ?
ⓒPrakash

बुधवार, २४ जून, २०२०

आमचं टॅलेंट

साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं ध्येय
तुमच्या या नोकरीत राख  झालं
फास्ट सेकंड नाईट 
करता करता तुमचं काम झाक झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
तुमची कामे करता करता 
माझ्या आयुष्यच सगळ्यांकडून
मोजमाप झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
प्रमोशन डोळ्यासमोर ठेवून 
इथंच करियर आहे हे मनात आला
थोड्या प्रशंसेल भुलून साहेब साहेब केलं
तरीपण  काढून टाका याना अस मनात तुमचा आले
साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं स्वप्न राख झालं
अरे मीच तो हरामखोर कामगार 
इवल्याश्या नोकरीत समाधान मानुन
स्वतःच्या ध्येयला विसरून आज म्हणतो
साहेब माझं टॅलेंट खाक झालं
मनाशी बाळगले स्वप्न राख झालं
ⓒPrakash

रविवार, १४ जून, २०२०

स्वतःवर विश्वास असेल तर ?

आपला विश्वास स्वतःवर नसतो.स्वतःवर विश्वास असता तर मनात आणलेली प्रत्येक गोष्ट खरी करण्याची ताकद आपल्यात असते. आणि ती गोष्ट खरी करून दाखवली असती. पण आपलं तसं नसत.जेव्हा आपण असं  करू तेव्हा नक्कीच यशस्वी होऊ शकतो. मनात खूप कल्पना असतात पण त्या प्रत्यक्षात आणताना खूप अडचणी येतात  त्या अडचणी कश्या दूर करायच्या  व त्यासाठी काय उपाय करता येतील जेणेकरून आपलया  मनातील कल्पना आपली ध्येय  प्रत्यक्षात आणता येतील.  हे शोधणं  गरजेचं आहे. 
 नवीन काही तरी करण्याची प्रेत्यकाची  इच्छा असते पण अंमलबजावणी करण्याची वेळ येते. तेव्हा मग घरातले शेजारचे गावातले काय बोलतील हा एका प्रश्न समोर उभा राहतो आणि या प्रश्नात आपण जर अडकलो कि काय करावं हेच काळात नाही आणि मग आपण समोर येईल. ते मिळेल ते करत असतो  .आजकालची तरुण पिढी नवीन इनोवेशन मध्ये मागे पडत आहे. जगात काय चालू आहे कोणत्या क्षेत्रात संधी आहे त्यात आपण काय करू शकतो आपल्या स्वतःची आवड काय आहे. आपल्याला काय करायला जमेल याचा शोध घेतला पाहिजे. स्वतःवर विश्वास असेल तर हे नक्की करू शकतो या साठी त्यांना घरातून प्रोचाहन दिलं  पाहिजे. शालेय शिक्षणा सोबत व्यवसायिक शिक्षण घेणं हे महत्वाचं आहे. 
म्हणून म्हणावं वाटत की इतरापेक्ष्या स्वतःवर विश्वास ठेवावा आणि ध्येय प्राप्ती साठी प्रयत्न करावं. इतरांचा विश्वास तुमच्या वर असेल तर तुम्ही फक्त नोकरीच करू शकता स्वतःवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नोकरी निर्माण करु शकता..

ⓒPrakash

चारोळ्या ४

1)स्वतःबद्दल एखाद्याला
खूप काही सांगून जातो आपण.
खरोखर तितके
खरे असतो का आपण . . .

2)प्रेत्यक व्यक्तीची 
एक कथा असते.
काही व्यक्तीसाठी
ती व्यथा असते...


ⓒPrakash

सोमवार, १ जून, २०२०

आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक


आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक आपले व्यवसाय मिठागरे मासळी दूध भाजी चे मळे गवंडी काम (मेस्त्री) गरजेच्या च्या  वस्तूची दुकाने  इत्यादी येत्या ५० वर्षात परिस्थिती खूप बदलली आमचा व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे लागलो आणि याच व्यवसायात परकीय येऊ लागले बंद झालेली आमची व्यवसायिक वृत्ती पुन्हा सुरू करावी लागेल अन्यथा परिस्थितीत खूप गंभीर होऊ शकते आपले स्थानिक उ्योगांना पुन्हा चालना देणे गरजेचे आहे...सरकारी प्रकऌप या मुले आपले  मूळ व्यवसाय बंद पडले जमिनी गेल्या आणि आमचा शेती भाजीचे मळे दुध आणि इतर जोड उद्योग कमी झाले मला वाटतं आमच्या आजोबा पासून ची पिढी नोकरी कडे वळली असेल त्यांचा व्यवसाय होता दूध उद्योग आणि भाजीचे मळे नोकरी करता करता मुलांच्या मनात नोकरी रुजली ते कळलेच नाही आणि मग आपणही  तेच करू लागलो मग शेती कडे कमी लक्ष्य दिले गेले त्याला जोड होती पशुपालन दूध उद्योग गायी म्हशी विकल्या जाऊ लागल्या. जणू मूळ आमची व्यवसायिक वृत्ती कुणीतरी  हिरावून घेतली गेली. मुळात उद्योगाचे मूळ आम्ही आणि आज आम्हीच नोकरीचे झाड होत आहेत..पण त्याला आता व्यवसायाच्या वटवृक्षात रूपांतर करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण समाजात एकी करून एकमेकांना प्रोसहित करणे गरजेचे आहे तरच आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते अनाथ काळ कठीण आहेच परिस्थिती हता बाहेर जाण्याआधी वेळीच सावधान झालेले योग्य आहे नाहीतर इतर समाज्याचा धंद्यात आपल्याला नोकरी करावी लागेल ...
ⓒPrakash