शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

note 19122020

 मला वाटतं आयुष्यात वेटींग पिरियड कधीच नसतो जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही आधीचा काळ म्हणजे वेटींग पिरियड 

note 19122020

 If you do not travel,

If you do not read,

If you do not listen to the sounds of life,

You start dying slowly

सूर्याला मागे सोडून मी पुढे पळत होतो

 सूर्याला मागे सोडून मी पुढे पळत होतो संध्याकाळ झाली आणि सूर्य माझ्याजवळ आला आणि हळूच म्हणाला रात्र होईल आता पुन्हा पाहायचं आहे उद्या पुन्हा पळायच आहे आयुष्यासाठी आपल्याला जायचं आहे असच लढायचं आहे

मंगळवार, ७ जुलै, २०२०

मस्त पाऊस होता

मस्त पाऊस होता
पण मी भिजले नाही
सोबत तू नाहीस
हेच मनाला रिझले नाही ।।
वट पहाते तुझी तू येणार
पण तू हि पावसासारखा
कधी वेळेवर येत नाही
पावसाच ठीक आहे ।।
पण तू वेळेवर ये
मला सोबत घे
मग आपण दोघेही पाऊसात
चिंब होऊन जाऊ
आपल्या प्रेमाचं गीत गाऊ
पण ! तूच सोबत नाहीस
म्हणून मी भिजले नाही
अश्रू लपवून मनात
रडणेही मला जमले नाही ।।
मस्त पाऊस होता
पण मी भिजले नाही

ⓒPrakash

बुधवार, १ जुलै, २०२०

पायी चालतो मी विठूचा वारकरी


तुझ्या नामाच्या गजरात
गुंग होते दुनिया सारी ।।
पायी चालतो मी विठूचा वारकरी

ना विसरलो कधी भक्ती 
ना चुकली कधी वारी ।।
पायी चालतो मी विठूचा वारकरी

नाम घेतो विठ्ठलाचे जयघोष करी 
राम कृष्णा हरी राम कृष्णा हरी ।।
पायी चालतो मी विठूचा वारकरी

अशी कशी हि रोगराई अली
ज्याने चुकवली तुझ्या भक्ताची वारी।।

आज मानातूनच निघाली विठुराया तुझी वारी 
एकाच विनवणी करतो घालाव हि महामारी ।।
ज्याने चुकवली तुझी वारी!!
पायी चालतो मी विठूचा वारकरी

ⓒPrakash
पायी चालतो मी विठूचा वारकरी


थोडं थांबलोय

शनिवार, २७ जून, २०२०

काळ


भूतकाळ भविष्य काळाला भेटला 
मग मी कसा आणि तू कसा असशील
असे प्रश्न निर्माण होऊ लागले 
वर्तमान गप्प उभा होता आता कसा जगायचं या प्रश्नात
भूतकाळ चांगला होता त्यात भविष्याची चिंता दिसत नव्हती 
तो जगून गेला होता वर्तमान चिंतेत होता तो भविष्यात कसा जगायचं या ?
ⓒPrakash

बुधवार, २४ जून, २०२०

आमचं टॅलेंट

साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं ध्येय
तुमच्या या नोकरीत राख  झालं
फास्ट सेकंड नाईट 
करता करता तुमचं काम झाक झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
तुमची कामे करता करता 
माझ्या आयुष्यच सगळ्यांकडून
मोजमाप झालं
पण आमचं टॅलेंट खाक झालं
प्रमोशन डोळ्यासमोर ठेवून 
इथंच करियर आहे हे मनात आला
थोड्या प्रशंसेल भुलून साहेब साहेब केलं
तरीपण  काढून टाका याना अस मनात तुमचा आले
साहेब आमचं टॅलेंट खाक झालं
मनाशी बालगलेलं स्वप्न राख झालं
अरे मीच तो हरामखोर कामगार 
इवल्याश्या नोकरीत समाधान मानुन
स्वतःच्या ध्येयला विसरून आज म्हणतो
साहेब माझं टॅलेंट खाक झालं
मनाशी बाळगले स्वप्न राख झालं
ⓒPrakash

रविवार, १४ जून, २०२०

स्वतःवर विश्वास असेल तर ?

आपला विश्वास स्वतःवर नसतो.स्वतःवर विश्वास असता तर मनात आणलेली प्रत्येक गोष्ट खरी करण्याची ताकद आपल्यात असते. आणि ती गोष्ट खरी करून दाखवली असती. पण आपलं तसं नसत.जेव्हा आपण असं  करू तेव्हा नक्कीच यशस्वी होऊ शकतो. मनात खूप कल्पना असतात पण त्या प्रत्यक्षात आणताना खूप अडचणी येतात  त्या अडचणी कश्या दूर करायच्या  व त्यासाठी काय उपाय करता येतील जेणेकरून आपलया  मनातील कल्पना आपली ध्येय  प्रत्यक्षात आणता येतील.  हे शोधणं  गरजेचं आहे. 
 नवीन काही तरी करण्याची प्रेत्यकाची  इच्छा असते पण अंमलबजावणी करण्याची वेळ येते. तेव्हा मग घरातले शेजारचे गावातले काय बोलतील हा एका प्रश्न समोर उभा राहतो आणि या प्रश्नात आपण जर अडकलो कि काय करावं हेच काळात नाही आणि मग आपण समोर येईल. ते मिळेल ते करत असतो  .आजकालची तरुण पिढी नवीन इनोवेशन मध्ये मागे पडत आहे. जगात काय चालू आहे कोणत्या क्षेत्रात संधी आहे त्यात आपण काय करू शकतो आपल्या स्वतःची आवड काय आहे. आपल्याला काय करायला जमेल याचा शोध घेतला पाहिजे. स्वतःवर विश्वास असेल तर हे नक्की करू शकतो या साठी त्यांना घरातून प्रोचाहन दिलं  पाहिजे. शालेय शिक्षणा सोबत व्यवसायिक शिक्षण घेणं हे महत्वाचं आहे. 
म्हणून म्हणावं वाटत की इतरापेक्ष्या स्वतःवर विश्वास ठेवावा आणि ध्येय प्राप्ती साठी प्रयत्न करावं. इतरांचा विश्वास तुमच्या वर असेल तर तुम्ही फक्त नोकरीच करू शकता स्वतःवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नोकरी निर्माण करु शकता..

ⓒPrakash

चारोळ्या ४

1)स्वतःबद्दल एखाद्याला
खूप काही सांगून जातो आपण.
खरोखर तितके
खरे असतो का आपण . . .

2)प्रेत्यक व्यक्तीची 
एक कथा असते.
काही व्यक्तीसाठी
ती व्यथा असते...


ⓒPrakash

सोमवार, १ जून, २०२०

आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक


आपला आगरी कोळी समाज मुळात इथला स्थानिक व्यासायिक आपले व्यवसाय मिठागरे मासळी दूध भाजी चे मळे गवंडी काम (मेस्त्री) गरजेच्या च्या  वस्तूची दुकाने  इत्यादी येत्या ५० वर्षात परिस्थिती खूप बदलली आमचा व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे लागलो आणि याच व्यवसायात परकीय येऊ लागले बंद झालेली आमची व्यवसायिक वृत्ती पुन्हा सुरू करावी लागेल अन्यथा परिस्थितीत खूप गंभीर होऊ शकते आपले स्थानिक उ्योगांना पुन्हा चालना देणे गरजेचे आहे...सरकारी प्रकऌप या मुले आपले  मूळ व्यवसाय बंद पडले जमिनी गेल्या आणि आमचा शेती भाजीचे मळे दुध आणि इतर जोड उद्योग कमी झाले मला वाटतं आमच्या आजोबा पासून ची पिढी नोकरी कडे वळली असेल त्यांचा व्यवसाय होता दूध उद्योग आणि भाजीचे मळे नोकरी करता करता मुलांच्या मनात नोकरी रुजली ते कळलेच नाही आणि मग आपणही  तेच करू लागलो मग शेती कडे कमी लक्ष्य दिले गेले त्याला जोड होती पशुपालन दूध उद्योग गायी म्हशी विकल्या जाऊ लागल्या. जणू मूळ आमची व्यवसायिक वृत्ती कुणीतरी  हिरावून घेतली गेली. मुळात उद्योगाचे मूळ आम्ही आणि आज आम्हीच नोकरीचे झाड होत आहेत..पण त्याला आता व्यवसायाच्या वटवृक्षात रूपांतर करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण समाजात एकी करून एकमेकांना प्रोसहित करणे गरजेचे आहे तरच आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते अनाथ काळ कठीण आहेच परिस्थिती हता बाहेर जाण्याआधी वेळीच सावधान झालेले योग्य आहे नाहीतर इतर समाज्याचा धंद्यात आपल्याला नोकरी करावी लागेल ...
ⓒPrakash

कोरोना कसला हा आजार

 कोरोना
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
अफवा आहेत हजार
आणि लोक झालेत बेजार
लॉक डाऊन मध्ये होत आहे वाढ
लॉक डाऊन एक दोन तीन चार
घरात बसून मात्र लोकं झालीत बेजार 
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
रोज वाढत आहे रुग्णांचा जोर 
दवाखाने होत आहेत कमजोर 
सरकार करतोय आपली चिंता
पण सुविधांचा होत आहे इथे गुंता 
कसला हा आजार कि 
मांडलाय नुसता बाजार
सगळीकडून होत आहे मदतीचा हातभार
त्यांचे मानले पाहिजेत हतजोडून आभार 
कसला हा आजार 
मांडलाय नुसता बाजार
बस मला एकाच प्रश्न पडलाय 
कुठे गेलेत बाकीचे आजार
ⓒPrakash





गुरुवार, ७ मे, २०२०

फिरत आहे बाहेर कोरोनाचे राक्षस

नको बाहेर कुठे इकडे तिकडे सगळीकडेच फिरत आहे हे राक्षस आज मनात भीती निर्माण झाली कोरोनाची वारी आमच्या जवळपास आली सूरवात चीनमध्ये झाली अशी कशी महामारी आली हॉस्पिटल थकले डॉक्टर थकले थकले सारे जग हे देवा तूच आता आमचे कडे बघ उपाय एकाच आहे स्वतःच स्वतःची काळजी घेणे आणि घरात बसून राहणे


गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

The state of boyfriend and girlfriend caused by Corona

The state of boyfriend and girlfriend caused by Corona

It's been a long day
The two have not met
No talking face to face.
Everything is on the phone all night long
No more paperwork
Living online
Love is now virtual
Chatting is everything
The setting is love
Status keeping means
To express feelings
Both are working
Pine for each other ..
Just stop  Corona
Let us meet each other now
It's been a long day
The two have not met
No talking face to face.
 

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

कोरोना मुळे झालेली प्रियकर आणि प्रियसी ची अवस्था


खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही 
समोर समोर बोलणं नाही.
फोनवरच असतं सगळं रात्र रात्र 
आता नाहीत ती कागदी पत्र
ऑनलाईन झालाय जगणं
व्हर्चुअल झालाय आता प्रेम
चॅटिंग म्हणजे सगळं असतं 
सेटिंग म्हणजे प्रेम 
स्टेटस ठेवण म्हणजे
भावना व्यक्त करणं
दोघांच चाललंय 
एकमेकांसाठी झुरणं.. 
बस संपूदे हा कोरोना  
आम्हाला एकमेकांना आता भेटू दे 
खुप दिवस झाले
दोघांची भेट नाही 
समोर समोर बोलणं नाही.

ⓒPrakash






गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

स्वार्थी माणसा

तु असा कसा होत चाललास 
माझं माझं करता करता तू
आपली नाती तू विसरत चाललास
सुखाच्या मागे धावता धावता
आपल्यांची दुःख विसरत चाललास
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
पैसा भरपूर कमविलास 
तो कमविताना तू खूप स्वार्थी झालास 
तुझं माझं करता करता तू असा कसा झालास 
आपल्यानंच विसरून गेलास 
हे माणसा तू असा कसा होत चाललास.
अजूनही वेळ आहे 
तुझ्यातल्या माणसाला हरवून देऊ नकोस
फक्त एकच सांगेल या कवितेतून तुला  
सुख कायम नाही
महत्व दे नात्याला 
नातीच साथ देतील
आयुष्यभर आपल्याला....

ⓒPrakash

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

चांगले विचार

एका पुस्तकात वाचलेले काही चांगले विचार 

१)एखाद्या कामात अपयशी ठरणं  अशक्य आहे असे समजून काम करावे. 
२)कठीण काळ जास्त वेळ राहत नाही पण मजबूत खंबीर माणूस जास्त वेळ टिकून राहतो .
३)भाग्य त्यांची  साथ देतो जे स्वतःच्या कामात गुंततात आणि मगच देवाची मदत मागतात.
४)पेनाची ताकद तलवारी पेक्षा जास्त असते. 
५)आपला वेळ आणि पैसे दोन्हीही जपून खर्च करावा. 
६)पतंग वाऱ्या बरोबर नव्हे तर त्याच्या विरुद्ध वर जाते. 
७)कोणताही गुंता काढण्यासाठी त्याची प्रथम सुरवात करावी लागते.
८)व्यापार सायकली प्रमाणे असतो चालवत राहा नाहीतर पडून जा .
९)समस्या बदल विचार करण्यापेक्षा संधी बद्दल विचार करणे अधिक चांगले .
१०)माश्याने जर तोंड बंद ठेवले तर तो कधी पेचात सापडणार नाही

रविवार, १२ एप्रिल, २०२०

वादा

निभा सके ऐसा 
कोई वादा करो 
       अगर निभा ना सके 
           तो इरादा भी न करो..




गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

चारोळी-3

किती भावना लपवल्या
तरी डोळे त्या सांगतात
मनातलं गुपित आपलं 
लोकांसमोर मांडतात
 

भेटली होती ती

चारोळ्या 
1)भेटली होती ती
आवडली होती ती
मनात भरली होती ती
म्हणून निवडली होती ती

२)काय चाललंय आपल्यात
हे असं बरोबर नाही
ती म्हणते प्रेम आहे 
बाकी खोटं असं काही नाही

3)आज भेटलोय आपण
उद्या असा भेटायाच त्रास नको
तो म्हणतो ठीक आहे 
पण भेटायची वेळ झाली
की मग तुझा भास नको

4) ती म्हणते आजकाल
आपण रोज भेटतो
त्यात नवल काय असं
आपण कालचीच कहाणी रेटतो

5)त्या दिवशी तुझ्या येण्याची
    कारणे मला कळली होती
    म्हणून पुन्हा माझी वाट
      तुझ्या कडे वळली होती

चारोळ्या-1

1)आठवणींचा तुझ्या
      काळजाला स्पर्श होतो.
      आठवणीत तुझ्या प्रेमाचा 
        मलाही मग हर्ष होतो.

2)अधीन झालोय मी
         स्वाधीन झालोय मी.
          मी तिच्या प्रेमाचा 
              बाधित झालोय मी.

3) पहिल्यांदा पाहशील 
     रागणेच पाहशील.
       मग इतक जवळची हो 
         की मनातलं ओळखशील.

4)उतरव तू चस्मा 
         वेगवेगळ्या रंगाचा. 
                  सांग आता धर्म कोणता 
                              आकाशाचा आणि सूर्याचा. 
5)भेटणार्यांना भेटण्याची 
     कारणे खूप असतात. 
      आणि न भेटणार्यांना ती 
       द्यायची नसतात.


बुधवार, ८ एप्रिल, २०२०

आपलं डोकं

आपलं डोकं आहे ना ते काही पण करू शकत कोणती असाध्य ते साध्य करू शकतो.आपल्याला हवं ते करू शकतं त्याच्या कडून आपण करवून घेऊ शकतो  
पण आपण त्याला समजूत घालून एखाद्या ठिकाणी किवा एखाद्या आशेत ठेवत असतो.समाधानी करून ठेवत असतो सर्व ठीक होईल असा होईल थोडा वेळ लागेल. पण होईल अश्या आशेवर पण मग तसं कधी तरी नाही झालं तर विचार करत बसण्याची वेळ येते म्हणून वाटत कि आपण आपल्या सीमा आजमावल्या पाहिजेत सुरवातीला त्रास वाटेल पण एकदा का आपण  यशस्वी झालो कि सर्व आपलाच असत.प्रयत्न कारण गरजेचं आहे


 

ध्येय ठरवा आणि ते मिळावा

खरंतर प्रत्येकात काही तरी बनण्याची क्षमता असते.शैक्षणिक जीवनात काय बनायचं आहे हे निश्चित करणं गरजेचं असत.या साठी घरातील वातावरण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असत.मार्गदर्शन योग्यवेळी आणि योग्य मिळालं तर आपण आयुष्यात नक्कीच आपलं स्वतःचा ध्येय ठरवू शकतो आणि ते ध्येय गाठू शकतो.प्रत्येकच्या मनात आपण काहीतरी बनलं पाहिजे हे असत पण नक्की काय बनलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याची योग्य अशी प्लांनिंग नसते दिशा ठरलेली नसते आणि मग वेळेनुसार आपल्या आयुष्यत जे  घडत जातं किंवा आपण करत जातो यातच समाधान मनात जातो..शालेय जीवनात मनात असत कि आपण काहीतरी  बनलं पाहिजे.नोकरी व्यासायिक इंजिनियर शिक्षक लेखक गायक  पण जे काही बनायचं आहे त्या साठी मार्गदर्शन नसल्याने आयुष्यात जे कधी मिळत जाते त्यात समाधान मानात असतो. नोकरी म्हणजे आपल्याला पुढे काहीतरी भेटेल या आशेने आपण करत असलेली तडजोड असते. सध्या पगार कमी आहे नंतर वाढेल पुढे साहेब चांगला आहे शिकायला भेटत एका ना अशी खूप वाक्य आपण अनेक जणांकडून ऐकत असतो.आणि मग वर्षाला हजार वाढतात म्हणून तीच नोकरी आयुष्यभर करत राहतो..एकदा का संसाराच्या गाड्यात अडकला कि ती नोकरी म्हणजे सर्वस्व उरतं.जास्त पगाराच्या नोकरीसाठी जुनी नोकरी सोडून नवी शोधू शकत नाही करणं नवी नोकरी मिळेल याची शास्वती नाही.जगण्याच्या  एका रुटिंगची सवय झाली ती बदलण्याची भीती मनात असतेच. त्यातून बाहेर पडणं कठीण असत.
खरंतर आपण जेव्हा कॉलेज संपून बाहेर पडतो तेव्हा आपण काय बनायचं  हे ठरलेलं असलं पाहिजे.कोणत्या क्षेत्रात जायचं याची प्लांनिंग ठरलेली असली तर नक्की आपण आपलं ध्येय गाठू शकतो..
तुर्ताच.थांबतो आणि इतकंच सांगू इच्छितो
"प्रेत्यक व्यक्ती बॉम्ब सारखी असते
फक्त त्याची पिन काढायची गरज असते ".
आपल्यात खूप काही बनण्याची क्षमता असते
पण आपण काय बनत असतो हेच आपल्याला लक्षत येत नाही..
:-धान्यवाद
ⓒPrakash

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

सूर्य



बुडताना दिसलो म्हणून मी कधी बुडत नाही. 
                                                   सूर्य आहे मी माझं कुणावाचून अडत नाही.

विचार

काहींच्या वस्तू ब्रॅण्डेड असतात
तर काहींचे विचार
वस्तू वापरल्या जातात
विचार आत्मसात केले जातात
वस्तू संपून जातील
चांगले विचार कायम सोबत राहतील
माणसं ही आजकाल सोडून जातात
स्वतःच स्वार्थ साधला की
विचारांचं तस नसतं ते नेहमी आपल्याला साथ देतात आपल्या सोबत असतात.
या जगात वावरण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी..

ⓒPrakash



गावाचं गावपण

सिमेंटच्या जंगलानी हिरवळीवर राज्य केलं
तुम्हीच सांगा आता आमच्या गावाचं गाव पण कुठे गेलं!

आज तीस वर्षे झाली लहानपणापासून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीना बारकाईने बघत आलोय आपला गाव आपली शेती बैलगाडी सायकल आणि एसटी म्हणजे अताचा लाल डबा आता आपल्यासाठी तो लालडबा झालाय पण एक पंधरा वीस वर्षांपूर्वी तो आपल्याला शहराकडे घेऊन जाण्याचा एकमेव साधन होती. असो आज असं विचार करतोय की
 आपला गाव कसा हळूहळू बदलत गेला. सगळेच लोकं शेती करत होते कुडाची घरे तर काही कौलची घरे त्यात नंतर  सिमेंटचे पत्रांची घरे आली पण आता ती ही कमी होत चालली आहेत आता सिमेंटचा स्लाप झालाय बिल्डिंग आल्यात कारण "शेतकऱ्याला जमिनीचा पैसा पण आलाय."
सगळ्यात गावाला नैसर्गिक सुंदर होत आंबे जांभळी करवंदे बोरे असे कित्येक झाडे होते नैसर्गिक सौंदर्य खूप होता. झाडाच्या सावलीत म्हातारा आजोबा सहज झोपी जात होते. आज बंद  खोलीत एसी असून सुद्धा काहींना झोप लागत नाही.
विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पांसाठी गेल्या काही ठिकाणी प्रकल्पही उभारले एमआयडीसी सिडको असे अनेक प्रकल्प आज शेतकऱ्यांच्या जीवावर आले त्यांच्या जमिनी हस्तांतरित केला आणि इथला शेतकरी भूमिहीन झाला जी काही थोडीफार जमीन उरली आहे त्यातही आज नैना आली आहे navi mumbai  influence notified area (NAINA) त्यांनी उरलेली जमीन घेण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना पूर्णता भूमिहीन करण्याचा जणूकाही कट रचला आहे असा विकासाच्या नावावर इथल्या स्थानिकांच्या जमिनी प्रकल्पांना जात आहेत. ज्या जमिनीवर इथला भूमिपुत्र वर्षानुवर्ष शेती करत होता व आपली उपजीविका करत होता.. खूप जण म्हणत असतात जुना काळ कसा होता खरच जुना काळ बराच होता कारण त्यावेळी घरात एकी होती गावात एकी होती आणि समाजातही एकी होती पण आता बदल होत गेला आणि माणस स्वार्थी होत गेली. इतके बदल झाले. मातीच्या घराच्या भिंतींना ओलावा होता तसाच ओलावा त्या काळातल्या माणसाच्या नात्यांनाही होता.पण सिमेंटच्या घरांप्रमाणेच काडक कठोर झाली आहेत.
गावात जर कोणी आजारी असेल तर पूर्ण गाव त्यांना पाहण्यासाठी येत होता. पण काळ बदलला आता कुणी मेला तरी पाण्यासाठी जात नाही आपल्याला काय करायचंय आहे ते बघून घेतील अशी वृत्ती झाली आहे.
असं गावात राहिला नाही जिथे माणसात माणुसकी होती आणि सर्व माणसेही सुखी होती....
म्हणून म्हणावं वाटलं 
"सिमेंटच्या जंगलानी हिरवळीवर राज्य केलं"
"तुम्हीच सांगा आता आमच्या गावाचं गाव पण कुठे गेलं!"

ⓒPrakash

रविवार, ५ एप्रिल, २०२०

चारोळी



  तुझ्यातला मी
माझ्यातली तू
व्यक्त कसा होऊ
सांग आता तू

मी मनातला !

मी मनातला ! खरंतर प्रत्येक जण स्वतःच्या मनात स्वतःच एक वेगळं अस्तित्व घेऊन जगात असतो.कधी ना कधी एकांतात बसून जगण्यापलीकडे एक विचार करत असतो.ब्लॉग सर्वांना वाचण्यासाठी बनवला आहे आणि वाचणारा प्रेत्यक जण हा एक रसिक आहे...आणि म्हणून त्या प्रेत्यक रसिकास सादर करतो..मी मनातला ..आणि म्हणून मी मनातला  टायटल दिल आहे ..